अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना व्हायरसच्या वाढत्या पार्दुर्भावामुळे लॉकडाऊन च्या काळात जवळपास दीड महिने दारू विक्री बंद होती मात्र दारू विक्री सुरु होताच जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालीय.
वडील दारू पितात म्हणून मुलाने त्यांना मारहाण केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला मात्र ही घटना समजताच त्या मृत आजोबांच्या नातीने स्वताच्या वडिलांवरच खुनाचा गुन्हा दाखल केलाय
ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या कोतुळ परिसरात असणार्या बोरी गावात रविवार दि.17 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या दुर्दैवी घटनेत भागवत गोमा कांबळे (वय 70) हे मयत झाले असून त्याचा पुत्र राजेंद्र भागवत कांबळे याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मृत भागवत यांचे वय झाल्यामुळे त्यांना शरिर फारसे साथ देत नव्हते. त्यातल्या त्यात ते मद्य पिल्यानंतर त्यांना जास्त काही सुधरत नव्हते. त्यामुळे, त्यांचा मुलगा राजेंद्र हा नेहमी समजून सांगत असे की, तुम्ही दारु पिऊ नका.
पण, भागवत यांना मद्याचे व्यसन असल्यामुळे त्यांना राहवत नव्हते. दरम्यान देशात कोरोनाने सगळ्यांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढविली आहे. त्यामुळे गेली दिड महिना दारुचा अस्वाद घेण्यासाठी कोणाला मिळाला नाही.
अखेर कोणीतरी भागवत यांना मद्य आणून दिले आणि त्यांच्याच मुलाने त्यांचा जीव घ्यावा इतकी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. राजेंद्र याने वडीलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा जीव गेला.
हा प्रकार त्यांच्या नातीस समजला असता तीने अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी राजेंद्र कांबळे यास अटक केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com