ब्रेकिंग : माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांच हदय विकाराच्या झटक्याने निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक ते उपशहरप्रमुख व नंतर नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास होता.

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचं आज (दि, १) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. संध्याकाळी ते फिरायला गेले आणि फिरुन आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागल्याने त्यांना सावेडीतल्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असता डाॅक्टरांनी माजी नगरसेवक ढवण यांचं निधन झाल्याचं घोषित केलं.

दरम्यान, महाराज या टोपननावाने परिचित असलेले माजी नगरसेवक ढवण हे माजी आ. अनिल राठोड यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. धनगर समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

माजी नगरसेवक ढवण यांच्या अचानक झालेल्या निधनाने शिवसेनेचं मोठं नुकसान झालंय. ते राहत असलेल्या भिस्तबाग, ढवणवस्ती आदी भागांत महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी चांगली विकासकामे केली होती. नगरसेविका शारदा ढवण यांचे ते पती होते. माजी नगरसेवक ढवण  यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24