ब्रेकिंग ! माशाचे कालवण करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.

परंतु हा खून पतीनेच केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे. सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या व्यसनी पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण (वय 50) याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार (दि.02) रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या कुक्कडवेढे येथे मयत गंगाबाई बद्री चव्हाण ही ४२ वर्षीय महिला पाच ते सहा दिवसांपूर्वी तिचा पती बद्री चव्हाण व त्यांचा मुलगा ऊस तोडणीसाठी आले होते.

ते मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पतीची कसून झाडाझडती घेतली.

मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला. नंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला, अन् त्या महिलेच्या खुनाला वाचा फुटली. गंगा ही सायंकाळी स्वयंपाक करण्याच्या तयारीत असताना तिचा पती तेथे आला.

गंगाला माशाचे कालवण करण्यास सांगितले.पण सोमवार असल्याने तिने नकार दिला. त्यावरून त्या दोघात कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, पतीने गंगा हिस बाजूच्याच घनदाट झुडूपात नेऊन तिला गळा दाबून ठार मारले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24