ब्रेकिंग न्यूज! या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस प्रशासनाची एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

राहुरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ३५ रा. देहरे ता. राहुरी) या पोलीस कर्मचार्‍याने काल (दि. २० नोव्हेंबर) रात्री आत्महत्या केली.

दरम्यान या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं राहुरी पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे पोलीस दलातल्या तणावाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे उघड झालं आहे.

पोलीस कर्मचारी हापसे यांना काय त्रास होता, त्यांना नक्की कोणती समस्या होती, या कारणांचा शोध घेऊन अन्य पोलीस कर्मचार्‍यांना दिलासा देण्याची नितांत आवश्यकता आहे.

दरम्यान कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या सेवकांना अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवावी लागत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24