ब्रेकिंग न्यूज : कार पेटवून देत ठाकरे कुटुंबियांना जीव मारण्याचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात लाॅकडाउन असताना राहाता तालुक्यातील निमगाव कोर्राळे गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलेली स्विप्ट डिझायर ही चार चाकी गाडी उभी असताना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की निमगाव कोर्राळे गावात बाळासाहेब ठाकरे यांचे हाॅटेल आहे  ज्या परीसरात हि घटना घडली आहे त्या परीसरात काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडले होते तसेच  समोरच असलेल्या मोकळ्या मैदानात खुनाच्या घटना घडल्या होत्या,  

त्या बरोबरच खुन खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार आणि आता थेट चार चाकी पेटवून संपुर्ण घरचं उडवून देण्याचा प्रयत्न एका जागरूक तरुणांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून  वाहन पेटवून पळुन जात असताना दुचाकी वर दोन तरुण सी सी टिव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व पोलिस  पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासासाठी  चौकशी सुरू केली आहे. 

श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखी तक्रार शिर्डी पोलीसांनी घेतली असून  या घटनेबाबत पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले की संशयित आरोपीचे नावे मिळाली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून लवकरच  संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, या घटनेनंतर शिर्डी सह ग्रामीण भागात घबराट पसरली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24