अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- एक दिवसापूर्वीच नगर तालुक्यातील जेऊर गावच्या शिवारात जुगार अड्यावर छापा टाकून तेथे जुगार खेळणाऱ्यांना विशेष पोलिस निरीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या घटनेस काही तास पूर्ण होत नाहीत,
तोच परत याच पथकाने नगर तालुक्यातील अरणगाव -खंडाळा शिवारातील एका जुगार अड्यावर छापा टाकला.सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, जुगार खेळणाऱ्या २५ जणांना ताब्यात घेतले आहे.
योगेश माणिक सुपेकर, सागर शिवाजी कोल्हे, जगन्नाथ केरू शिंदे, अल्लाउद्दीन इसाक सय्यद, महेंद्र शिवानंद भांबळ, विशाल बबनराव चांदणे, विजय बबनराव शिंदे, गोंविंद शिवराम शिंदे, दत्तात्रय खुशालचंद गिरमे, हकिल अजिज पठाण, भाऊसाहेब दिलीप तोरडमल,
सुनील बंडू शितोळे, राहुल सुदाम गिरे, अनिल रामदास बोठे, अनिल हरिभाऊ दरेकर, दशरथ देवराम कांबळे, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड, गणेश प्रल्हाद चोबे,भरत अर्जुन चोबे, विकास पद्माकर वराडे, शेख लतिफ फत्तुभाई, कैलास मच्छिंद्र लक्षरे, किरण बबन मुके, संतोष दादाभाऊ साबळे, विशाल तुळशीराम थोरात या २५ जणांना ताब्यात घेतले आहे.
वरील सर्वजण नगर तालुक्यातील अरणगाव खंडाळा शिवारातील गटनं.३६६ या शेतात एका पत्र्याच्या शेडजवळ सतरंजी टाकून त्यावर पत्याचा झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून ८४ हजार ६१० रूपये रोख, ३ लाख ७० हजार रूपये किमतीच्या मोटारसायकली, ५५० रूपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ५५ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.