अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यंदाच्या वर्षी लाखो विद्यार्थ्यी बसले होते. ज्यांच्या भवितव्याचा मार्ग निकालानंतर खुला होणार आहे.
दहावीच्या परीक्षेला यंदा १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. ज्यांचा निकाल शिक्षण मंडळातर्फे जाहीर केला जाणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews