अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी केल्या हल्ल्यात विमल महादेव जाधव ही वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. चोरट्यांनी ५० हजार किंमतीचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून लंपास केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महादेव विमल जाधव हे घरात झोपले असताना मध्यरात्री चोरट्यांनी घराच ककडी वाजविली आणि दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. दरवाजा उघडाच विमल जाधव यांचे दोन्ही कान तोडले.
गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि धुम ठोकली.बेलवंडीचे पोलिस निरीक्षक दौलतराव अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.