भाऊ पक्का वैरी; पाण्याच्या वादातून केला खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-शेत जमीन, संपत्ती अशा देवाण घेवाण यामधून भावाभावामध्ये देखील वाद झाल्याचे अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.

मात्र याघटनेत थेट सख्या भावाने आपल्या भावाचा जीवच घेतला आहे. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील दोघा भावाच्या शेतीतील पाणी देण्याच्या वादातून एका भावाने आपल्या दुसर्या भावाला गंभीर मारहाण केली.

व यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी राहुरी पोलिसात विष्णू पुंजाहरी आढाव, प्रतीक विष्णू आढाव या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी ६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी दत्तात्रय आढाव यांचे मयत भाऊ ज्ञानेश्वर पुंजाहरी आढाव यांना फिर्यादीचे शेतातील बोरवेलचे पाणी त्यांच्या शेतात घेऊन जायचे होते.

त्यासाठी ज्ञानेश्वर आढाव हे आरोपी विष्णू पुंजाहरी आढाव याच्या शेतातून पाईप जोडीत होते. यावेळी आरोपी विष्णू पुंजाहरी आढाव, प्रतीक विष्णू आढाव हे त्या ठिकाणी आले.

तू आमचे शेतातून पाईप जोडू नको. असे म्हणून यातील त्यांनी मयत ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके असलेल्या लोखंडी खोऱ्याने व लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली.

यावेळी ज्ञानेश्वर आढाव यांना तातडीने अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24