अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गाजियाबाद शहरामध्ये एका क्रूर पतीने स्वताच्याच गरोदर बायकोला जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे.
या पतीने आपल्या गरोदर बायकोची चाकूने हत्या करण्याचा कट रचला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे त्याच्या बायकोच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट पत्नीला माहिती होती आणि तिला ते आवडत नसे.
पत्नी कायम या गोष्टीवरून बोलत असून तिला कायमचे संपवण्याचे ठरवून पतीने तिच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी घरात चोरी होणार असल्याचा प्लान बनवला आणि त्यादरम्यान पत्नीची हत्या झाल्याचा बनाव रचण्याचा कट त्याने केला.
त्याला अटक केल्यानंतर पोलिसांसमोर त्याने ही कबुली दिली आहे. या व्यक्तीचे त्याच्या मेव्हणीसोबत अनैतिक संबंध होते. म्हणूनच त्यांच्या संबंधातील अडथळा दूर कण्यासाठी त्याला आपल्या पत्नीची हत्या करायची होती.
त्याने आखलेल्या कटानुसार त्याने जिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते त्या मेव्हणीकडे आपल्या दोन मुलांना सांभाळायची जबाबदारी दिली.
पतीने सांगितल्याप्रमाणे, त्याने आपल्याच घरात स्वत:च आपल्या कुटुंबियांना बंदी करून चोरीचा कट रचला. या बनावट चोरीचाच आधार घेत त्याला आपल्या पत्नीची हत्या करायची होती.
त्याने पत्नीला विष देऊन मारण्याचा दोनदा प्रयत्न केला होता.त्यानंतर त्याने बाहेरील काही माणसांना पैसे देऊन पत्नीला गळा दाबून मारण्याचे काम करण्यास सांगितले.