ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : जमिनीच्या वादातून नको ते घडलं ! एका क्षणात कुटुंब उद्ववस्थ झालं

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वातावरण अगदीच गढूळ झाल्याचे दिसते. चोरी, दरोडे आदी काही घटना घडत असतानाच मागील काही दिवसात खुनाच्या भयंकर घटना घडल्या आहे.

आता पारनेरमधील एका घटनेने जिल्हा सुन्न झाला आहे. कार अंगावर घालून आईसह चिमुरड्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. घराच्या जागेच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समजते.

शीतल अजित येणारे (२७), स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शहरातील कुंभार गल्लीत गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजता घडली. वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला.

यानंतर मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे हिने पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. किरण राजाराम श्रीमंदिलकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. आरोपी या हत्येनंतर फरार झाला आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी शेजारी राहत असून घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात भांडणारे होत होती. किरण श्रीमंदिलकर हा येणारे कुटुंबाला नेहमी जिवे मारण्याची धमकी देत होता.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी शीतल आपला अडीच वर्षांचा मुलगा स्वराजला जेवण भरवत बाहेर घरासमोर बसल्या होत्या. त्याच वेळी आरोपी आपल्या कार ने तेथे आला. त्याने शीतल व स्वराज यांच्या अंगावर कार घातली. आवाज ऐकून शीतलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या.

त्यांना समोर शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. आरडाओरड ऐकून परिसरातील लोकांनी तिकडे धाव घेत जखमी शीतल व स्वराज यांना गाडीखालून बाहेर काढले. तेथील डॉक्टरांनी परिस्थिती पाहता उपचारासाठी नगरला हलवण्याचा सल्ला दिला.

शीतलला नगर येथील शासकीय रुग्णालयात तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान शीतलचा गुरुवारी रात्री ९ वाजता, तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.

* गाव शोकाकुल, संतप्त जमाव पोलीस ठाण्यात

शुक्रवारी दुपारी दोन्ही माय-लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. यानंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी जमावाने केली.

पोलिसही सध्या आरोपीचा शोध घेत आहे. फिर्यादी चंद्रकला यांचे कुटुंब गरीब असून मोलमजुरी करून ते पोट भरत आहेत.

Ahmednagarlive24 Office