अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईई आणि नीट परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कसे पोहोचणार हा प्रश्न उपस्थित झाला होता,ही बाब लक्षात घेत लोकल ट्रेनने जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी दिली आहे.
रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असणारे अॅडमिट कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर याचे परिपत्रक मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने जारी केले आहे.
या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. कोरोना संकटात 1 ते 6 सप्टेंबर या दरम्यान जेईईची परीक्षा, तर 13 सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा होणार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved