‘ह्या’ तालुक्यात कोरोनाबाधितांचे शतक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

आता तालुक्यातील करोनाबाधितांची संख्येने शतक पूर्ण केले आहे. काल शहरात 15 जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

यात वॉर्ड नं. 2 मध्ये 5, फातेमा हौसिंग सोसायटीत 5 तर रेव्हेन्यू कॉलनीत 4, व मोरगे वस्ती येथे 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात चार पुरुष, 9 महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 611 जणांचे घशाचे स्त्राव तपासण्यात आले असून यात 100 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले असून 358 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

रविवारी आलेल्या अहवालानुसार रेव्ह्येन्यू कॉलनीतील 4 रुग्ण हे एका कुटुंबातील आहेत. वॉर्ड नं. 2 मधील पाच पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत.

तर फातेमा हौसिंग सोसायटीतील हे दोन्ही रुग्ण नवे असून ते दोघेही स्वतःहून तपासणीसाठी गेले असता या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. रात्री उशिरा या सोसायटीतील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

तर मोरगे वस्ती येथील नवशक्ती चौकातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, आज अहमदनगरमध्ये १०० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

जिल्ह्यात आता ७५४ ऍक्टिव्ह रुग्ण असून १ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एकूण २ हजार २७ रूग्ण बाधित आढळले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24