अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले आहे. न्यायालयातील कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्याने न्यायालयापासूनचा शंभर मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
हा परिसर सील करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. तालुक्यातील १०० बाधितांपैकी ५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ४३ जणांवर उपचार सुरू आहेत.
दुर्दैवाने पाच व्यक्तींचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधित न्यायालयीन कर्मचारी नगरहून दररोज जाऊन येऊन करत होता. सोमवारी हा कर्मचारी न्यायालयात आला,
त्यावेळी प्रवेशद्वारावर त्याची तपासणी झाली. त्याला ताप असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सुमारे दोन तास तो कार्यालयात थांबला. त्रास जाणवू लागल्याने रजेचे सोपस्कार पूर्ण करून तो कार्यालयातून निघून गेला.
नगर येथे जाऊन त्याने खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली. या तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com