स्वस्त धान्याचा खर्च करणार खासदार डाॅ. सुजय विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24  :- जिल्हा प्रशासनाने शहरातील मुकुंदनगर भाग सील केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगरमधील सुमारे अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण करावे. या धान्याचा खर्च मी स्वतः देईन, असे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी बुधवारी सांगितले.

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी डॉ. विखे यांनी मनपात आढावा बैठक घेतली.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार विखे यांनी कोरोनाबाधित, क्वारंटाइनमधील नागरिक, प्रशासनाच्या उपाययोजना, राहण्याची व्यवस्था आदींचा आढावा घेतला. मुकुंदनगरची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर डाॅ. विखे म्हणाले, तेथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

भाजीपाला, किराणा यासंदर्भातील अनेक अडचणी येत आहेत. त्या दूर होणे आवश्यक आहे. मुकुंदनगरमध्ये नागरिकांना घरपोहोच स्वस्त धान्य सेवा कशी उपलब्ध होईल याबाबतही त्यांनी चर्चा केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24