स्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुकयातील मठाचीवाडी येथील स्वस्त धन्य दुकानात काही कारणास्तव दोन गटांत वाद झाला परिणामी दोन्ही गटाने परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

यात एका गटातील भास्कर सर्जेराव शिरसाठ रा.मठाचीवाडी (सुलतानपुर बुद्रुक) ता.शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिताराम श्रीपती करंजे व चकडुबाळ दादा भुमकर

यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम३/१(४)३ प्रमाणे

तसेच भा.द.वि.कलम ३३०,५०४,३४प्रमाणे गु.र.नं.९६४/२०२० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाने स्वस्त धान्य दुकानातील वडीलांच्या वाट्याचे धान्य देण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल

असे गैरवर्तन करुन तुमच्या नवऱ्याची नोकरी घालवितो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो. असा दम दिल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर सर्जेराव शिरसाठ रा.मठाचीवाडी

ता.शेवगाव याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गु.र.नं. ९६६/२०२० भा.द.वि कलम ३५४,३२३,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24