मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस आहे – मंत्री अशोक चव्हाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठीमहाविकास आघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे.

मात्र केंद्राचे धोरणच शेतकरी विरोधी आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? केंद्र सरकारची आयात-निर्यातीची धोरणं ही शेतकरीविरोधी आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवारी झाला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस आहे.

त्यांनीच सांगितले मला सहकारातले काही कळत नाही. मग आम्ही त्यांना सांगितले, सहकारी साखर कारखान्यांना पैसे दिले नाहीत तर ते अडचणीत येतील. त्यानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज हमी देण्याचा निर्णय झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24