राममंदिरासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली ही मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वृत्तसंस्था :- अयोध्येत राममंदिरासाठी ११ रुपये वर्गणी आणि एक वीट द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

मुख्यमंत्री पदावरील भाजपच्या नेत्याने राममंदिर उभारण्यासाठी लोकांना आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ असून, विरोधक या मुद्यावर भाजपला लक्ष्य करू शकतात. झारखंडमध्ये पक्षाच्या प्रचार सभेत बोलताना योगी म्हणाले की, ५०० वर्षे जुना वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अखेर निकाली निघाला.

काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना अयोध्या प्रकरणी तोडगा नको होता. कारण त्यांना या मुद्यावर कायम राजकारण करायचे होते. मात्र, मोदी सरकारने हा वाद निकाली काढला असून, अयोध्येत लवकरच एक भव्यदिव्य राममंदिर उभे राहील. यावेळी योगींनी उपस्थितांना राममंदिरासाठी ११ रुपये आणि एक वीट देण्याचे आवाहन केले.

भाजपच्या राजवटीत समाजातील सर्व घटकांना न्याय दिला जातो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आखल्या जातात आणि त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते, असा दावाही योगींनी केला.

अहमदनगर लाईव्ह 24