चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असताना ही वापर सर्रासपणे सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर – शहरात चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मकर संक्रातीच्या उत्सवामुळे शहरातील पतंगबाजीला सुरुवात झाली आहे.

मात्र त्यासाठी चायना बनावटीच्या मांजाचा वापर केला जात असल्याने नागरिक व पक्षी यांच्या जीविताला अपाय होऊ लागला आहे.

अशाच दोन घटनांत शहरातील दोन नागरिक जखमी झाले. नालबंदखुंट येथील सय्यद हारूण जरीवाला हे माळीवाड्यातून दुचाकीवरून जात असताना अचानकपणे मांजा त्यांच्या डोळ्यासमोर आल्याने, डोळ्याचा बचाव करण्याच्या गडबडीत, मांजा डोळ्यावरती ओढला जावून, त्यांच्या डोळ्याला इजा झाली.

शिवाय ते गाडीवरुन पडल्यामुळे खांदाही दुखावला गेला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्यास सांगितले आहे.

दुसऱ्या एका घटनेत एका नागरिकाचा गळा चिरला गेला. गड किल्ले संवर्धक ठाकूरदास परदेशी रस्त्याने जात असताना मांजामुळे त्यांचाही गळा कापला गेला.

मागील आठवड्यात कोपरगावमध्येही अशाच घटनेत एका नागरिकाचाही गळा कापला गेला होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24