अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनो व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली.

जिल्हा रुग्णालयात दि.६ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्याच्या घशातील नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे यांच्याकडून तपासून घेण्यात आले. हा अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. गाढे यांनी सांगितले.

नागरिकांच्या मनात कोणतीही शंका असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24