अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-शहरातून जाणार्या उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू होत आहे. यासाठी महामार्गावरील वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
नगर शहरातून नगर-पुणे महामार्गावरून जात असलेल्या या उड्डाणपुलाचे काम सक्कर चौकापासून सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
बीड, सोलापूर, औरंगाबाद, मनमाड, पुणे या महामार्गाने जाणारी वाहतूक वाळूंज, अरणगाव, केडगाव बायपासने वळविण्यात आली आहे.
औरंगाबाद-मनमाडकडून पुणे-दौंडकडे जाणारी वाहतूक शेंडी बायपास, केडगाव-अरणगाव-वाळुंज बायपासवरून वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान नागरिकांनो दिवाळीची खरेदीसाठी बाहेर जाणार असाल तर त्याआधी ही माहिती जरूर वाचून घ्यावी म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved