नागरिकांचा इशारा! अमरधाममधील अंत्यविधी बंद करा, अन्यथा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे. हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नालेगाव गावठाण, सुडके मळा यांसारख्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरत आहे. यामुळे, आरोग्यचा प्रश्न उभा राहिला आहे.

नालेगाव अमरधाम येथे फक्त शहरातील अंत्यविधी करण्यात यावी, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नालेगाव भागातील नागरिकांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे. यापूर्वी नालेगाव अमरधाम हे नगर शहराच्या हद्दीवर व नदी किनारी येत असल्यामुळे त्याबाबत कुणाचीही तक्रार नव्हती,

पण सद्यस्थितीत भौगोलिकदृष्ट्या नगरच्या वाढत्या नागरिकरणाच्यादृष्टीने मध्यवर्ती भागात आले आहे. तसेच साधारणपणे येथे मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार होण्यास सुरूवात झाली.

या धुरामुळे सर्व परिसरात प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरधाम या संकल्पनेनुसार अंत्यविधीसाठी नागरीवस्तीपासून लांब अंत्यसंस्कारासाठी सोय करावी.

व नालेगाव अमरधाम येथे अंत्यविधी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24