ब्रेकिंग : नगर शहरात पाण्याच्या टँकरवरुन पडून एकाचा मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

सोमवारी सायंकाळी वसंतटेकडी येथे जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू असतांना या संस्थेच्या टँकरवरील कर्मचारी कराळे हा टँकरवर चढला होता.

यावेळी तोल जावून घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24