अहमदनगर :- बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ शेख यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोन्ही आजी- माजी नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाले.
सर्जेपुरा परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या समर्थकांत राडा झाला. दगडफेेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक हारुण मुलानी व पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिस नाईक खंडागळे यांच्या फिर्यादीवरून अरिफ शेख, मुदस्सर शेख, समीर शेख, सादाब अरिफ शेख, समीर नाईक, सज्जाद शेख, वेल्डर इम्मु,
इमरान फिटर, मोग्या, शानू, लियाकत शेख, भंट्या, मज्जू, काल्या, हबीब मावावाला, तनवीर पठाण मस्तान, अमीर अन्वर याकूब नालबंद,
शेख अन्वर याकूब नालबंद, सद्दाम गफूर शेख, इम्रान नसीम शेख यांच्यासह ४० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या फिर्यादीनंतर अरिफ शेख व मुदस्सर शेख या दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.