अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आपल्या कामाने नगरकरांची मने जिंकली. सर्वांना आरोग्य सेवा मिळवून देण्याचे मोठे काम केले.
त्यांची कारर्किद सर्वांच्या स्मरणात कायम राहील, असे प्रतिपादन संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी केले.
राहुल द्विवेदी यांची मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संत सावता माळी युवक संघाच्या वतीने पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समता परिषद विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, दत्ता जाधव, निखिल शेलार, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved