दिलासादायक! जिल्ह्यात साठ हजाराहून अधिक कोरोनामुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या व्हायरसने आता हळूहळू जिल्ह्यातून माघार घेतली आहे. यामुळे दिवसेंदिवस धडकी भरवणरे आकडे आता चांगलेच कमी झाले आहे.

यातच जिल्ह्याचे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 96.47 टक्के एवढे झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान रविवारी नव्याने 171 कोरोना रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणार्‍यांची संख्याही 1 हजार 368 झाली आहे.

  1. बरे झालेली रुग्ण संख्या:64060
  2. उपचार सुरू असलेले रूग्ण: 1368
  3. मृत्यू:976
  4. एकूण रूग्ण संख्या:66404

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24