दिलासादायक! गेल्या 48 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असला तरी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे कोणाचाही बळी गेलेला नाही.

तसेच जिल्ह्यात हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटना दिसून येत आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.94 टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात आज 617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 43 हजार 497 इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 071 इतकी आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:43497

उपचार सुरू असलेले रूग्ण:3071

मृत्यू:741 एकूण रूग्ण संख्या:47309

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24