अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे.
दरम्यान्गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटती आकडेवारी पहिली असता कोरोना जिल्ह्यातून काढता पाय घेत आहे. रविवारी जिल्ह्यात ८८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात रविवारी ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सध्या १ हजार २६ जणांवरच उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ३७५ इतकी झाली असून मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ४८ इतकी आहे.