अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईपोटी साडे पाच हजार शेतकऱ्यांना आले साडेचार कोटी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात मार्च २०२० ते मे, २०२० या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील १३९ गावातील ५ हजार ४८ शेतकर्‍यांना अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ४ कोटी २७ लाख ८४ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  नुकसानीपोटी हे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. जिल्ह्यात मार्च, २०२०मध्ये पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली होती.

यामध्ये पाथर्डी तालुक्यातील ९५ गावातील ३ हजार ४९७ शेतकर्‍यांचे २ हजार १७५.९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यांना ३ कोटी ४८ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील १५ गावातील ८७३ शेतकर्‍यांचे २५१.६४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यांना ३३ लाख ९७ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. एप्रिल आणि मे महिन्यात कर्जत तर मे-२०२० मध्ये जामखेड तालुक्यातील काही गावांना अतिवृष्टीचा फटका बसला होता.

कर्जत तालुक्यात एप्रिल -२०२० मध्ये ५ गावांतील ११६ शेतकर्‍यांचे ४७.५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यांना ६ लाख ९७ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. मे महिन्यात कर्जत तालुक्यातील ५ गावातील १७१ शेतकर्‍यांचे ६६.९८ हेक्टर क्षेत्र   बाधित झाले होते.

त्यांना ११ लाख ४४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. मे-२०२० मध्ये जामखेड तालुक्यातील १९ गावातील ३९१ शेतकर्‍यांचे १६४.३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यांना २७.०२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24