धक्कादायक :काँग्रेस नेत्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन पक्षातील दुसऱ्या नेत्यासोबत गायब !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉंग्रेस पक्षातील एका नेत्याने दुसऱ्या नेत्याची बायको पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका काँग्रेस नेत्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन गायब झाली आहे. संबंधित काँग्रेस नेत्याने भरपूर शोधाशोध केली, मात्र पत्नी सापडली नाही.

दरम्यान या काँग्रेस नेत्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या फुटेजमधून खळबळजनक खुलासा झाला आहे. काँग्रेस नेत्याची पत्नी काँग्रेसमधीलच दुसऱ्या नेत्याच्या बाईकवर बसून जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काँग्रेस नेत्याने पक्षातील दुसऱ्या नेत्यावर बायकोला पळवल्याचा आरोप केला आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काँग्रेसचा नेता आपली तक्रार घेऊन पोलीस स्थानकात दाखल झाला. 

पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने संबंधित काँग्रेस नेता थेट भोपाळच्या काँग्रेस मुख्यालयात पोहोचला. त्याने आपलं सर्व गाऱ्हाणं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर घातलं.

घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या नेत्याला इंदौर डीआयजी रूचि वर्धन शर्मा यांच्याकडे पाठवलं आहे. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24