नागरिकांना दिलासा! कोरोनाची घौडदौड झाली संथ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून मानवजातीवर आलेलं कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसू लागले होते.

त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला होता. मात्र आता वाढते आकडेवारी काहीशी कमी झाली आहे. तालुक्यातुन नागरिकांना दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे.

तालुक्यामध्ये गेल्या २४ तासात केवळ दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी एकाही बाधीताची नोंद झालेली नाही. तर सोमवारी दोन बाधित आढळून आले आहेत.

सोमवारी तालुक्यात ४१ चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये एकही बाधित आढळून आला नाही. शासकीय चाचणीत एक तर खासगी चाचणीत एक बाधित आढळून आला आहे.

त्यामुळे अकोले तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३ हजार ०६५ इतकी झाली आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24