कॉन्स्टेबलला उपअधीक्षकाकडून मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर: मित्रांशी बोलत उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ केली. 

हा प्रकार मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्जेपुरा ते कापड बाजार रस्त्यावर पोलिस मुख्यालयाच्या परिसरात घडला. मारहाण झालेल्या पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात उपअधीक्षक पाटील व त्यांच्या वाहनचालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानी ऑर्डर्ली म्हणून कार्यरत असलेले पोलिस सागर भास्कर तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी रात्री मी सरकारी मोटारसायकलीवरून  जेवण करण्यासाठी पोलिस मुख्यालयात आलो. जेवण करुन परत पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानी निघालो हाेतो.
रस्त्यालगत मित्रांशी बोलत उभा होते. त्याचवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून सर्जेपुऱ्याच्या दिशेने आलेले उपअधीक्षक पाटील यांनी वाहनातून खाली उतरुन अचानक मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वाहनचालकानेही मारहाण केली.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24