लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ०५ जणांना डिस्चार्ज तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर. नगर शहर १८, संगमनेर ०४ जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर प्रत्येकी एक रुग्ण.९० जणांचे अहवाल निगेटिव्ह.जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण २५४ तर ॲक्टिव रुग्णांची संख्या 62.

अहमदनगर शहरातील तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि महापालिका अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत त्यांनी सूचना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आणि पोलिस यंत्रणेला दिल्या.

तसेच नागरिकांनीही सार्वजनिक संपर्क टाळावा,आजाराची लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24