अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोरोना प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लशीच्या संशोधनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतली.
पारनेरचे रहिवासी व सध्या पुण्यात असलेले सीरमचे संचालक उमेश शाळीग्राम हे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या पारनेर येथील सेनापती बापट विदयालयाचे विदयार्थी असून सन १९८५ मध्ये तेथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे.
सीरमच्या संशोधन कार्यामध्ये शाळीग्राम हे महत्वपूर्ण भुमिका बजावत असून मोदींच्या भेटीप्रसंगी त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे ते प्रकाश झोतामध्ये आले आहेत.
मांजरी येथील सीरमच्या कार्यक्षेत्रात मोदी पोहचल्यानंतर वाहनातून उतरताच शाळीग्राम यांनीच त्यांचे स्वागत केले. मुख्य इमारतीमध्ये गेल्यानंतर सायरस पुनावाला, सीईओ आदर पुनावाला, त्यांच्या पत्नी नताशा पुनावाला, उमेश शाळीग्राम तसेच डॉ.गोखले यांनी मोदींचे औपचारीक स्वागत केले.
त्यानंतर उमेश शाळीग्राम व डॉ. गोखले यांनी मोदी यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील कोरोना लशीसंदर्भातील संशोधन तसेच इतर शास्त्रीय माहीती दिली.
शाळीग्राम यांनी पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. सीरमच्या संशोधन कार्यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून मोदींच्या भेटीप्रसंगी त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे ते प्रकाशझोतात आले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठीच्या लशीची संपूर्ण जगाला प्रतिक्षा असून गेल्या काही महिन्यात या लशीच्या संशोधनात व्यस्त असलेल्या उमेश शाळीग्राम यांनी सीरमने मिळविलेल्या यशाची माहीती देशाच्या पंतप्रधानांना दिली.
संपूर्ण जगासाठी वरदान ठरणाऱ्या या लशीच्या संशोधकार्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या उमेश शाळीग्राम यांचे त्यांच्या वर्गमित्रांनी खास अभिनंदन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved