अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-जर तुम्हाला प्रवास करण्याची आणि मोटारीचा वापर करण्याची आवड असेल तर एसबीआय कार्डची ही ऑफर तुमच्यासाठी आहे.
एसबीआय कार्डने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या संयुक्त विद्यमाने ‘बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन’ ‘हे’ एक खास क्रेडिट कार्ड सुरू केले आहे.
या माध्यमातून बीपीसीएल इंधन व मॅक लुब्रिकेंट्स, भारत गॅस एलपीजी (वेबसाइट व अॅपद्वारे) आणि बीपीसीएलच्या इन एंड आउट सुविधा स्टोर खर्चावर रिवार्ड प्वाइंट्स मिळतील.
एसबीआय कार्डच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बीपीसीएल पेट्रोल पंपांवर इंधन आणि लुबिक्रेंट उत्पादनांवर 7.25% व्हॅल्यूबॅक (1% सरचार्ज सूटसह) आणि भारत गॅस खर्चावरील 6.25% कॅशबॅक मिळेल. या कार्डच्या माध्यमातून आपण डिपार्टमेंटल स्टोअर, किराणा, डाइनिंग आणि मूवीज यासारख्या खर्चावर बचत देखील करू शकता.
* मिनिमम ट्रांजैक्शन लिमिट नाही कार्डधारक या ऑफरचा लाभ देशभरातील बीपीसीएलच्या 17,000 इंधन केंद्रांवर घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे या ऑफरचा फायदा घेण्याचे किमान बंधन नाही म्हणजेच तुम्ही कितीही कमी खर्च केले तरी त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. याद्वारे ग्राहक प्रत्येक वेळी या कार्डद्वारे खरेदी करण्यावर बचत करू शकतील.
बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन चे फायदे