कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आढळले १८ बाधित रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.

नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे ०३,, टीवी सेंटर ०१, फकिरवाडा ०१. पाइपलाइन रोड ०१ रुग्ण आढळून आला.

भिंगार मधील गवळी वाडा येथे ०७ रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला.

पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24