अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत २८० रुग्णांची भर पडली. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४, अँटीजेन चाचणी मध्ये १८ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ जण बाधित आढळून आले.
त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १५३७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या ३०६८ इतकी झाली आहे. आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४८० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली.
यामध्ये अकोले ०४, पाथर्डी ०२, नेवासा ०१, नगर ग्रामीण ०४, मिलिटरी हॉस्पिटल २, कर्जत ०१, श्रीरामपूर ११, कोपरगाव ०३, मनपा ०३, श्रीगोंदा ०२, संगमनेर येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळले. त्यात, राहाता ०२, पाथर्डी ११, कोपरगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि मनपा
येथील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०४, अकोले ०१,कर्जत ०१, नगर ग्रामीण १६, नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी ०२, राहाता १४, राहुरी ०३, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com