कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर बातमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे.

चाचण्यांची संख्या वाढवून बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले.

त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या २३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

त्यामुळे आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३०३ झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९५७ इतकी झाली आहे. आजच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालनुसार बाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये नगर शहरातील २५, नेवासा येथील आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24