अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना गेल्या ३-४ दिवसापासून सुरुवात केली आहे.
आतापर्यंत १०९५ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५८ जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ८५४ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २०२७ इतकी झाली आहे
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे.
त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून बाधित आढळलेल्या 158 रुग्णांची आज भर पडली.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर ,कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या तीन-चार दिवसात केलेल्या चाच्ण्याचा एकत्रित अहवाल आज जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे येऊन त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद ही एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com