अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 26 कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणी अहवालात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत पाच जण बाधित अाढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता २६ झाली. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २६० नवे रुग्ण आढळून आले.
गुरुवारी रात्री राजेवाडी (जामखेड) येथील युवक दिल्ली येथे, नव नागापूर येथील व्यक्ती पुणे येथे आणि संगमनेर येथील व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आल्या होत्या.
त्या व्यक्ती तेथेच उपचार घेत आहेत. सारसनगर येथील एक व्यक्ती मुंबई येथे बाधित आढळून आली. जिल्ह्यातील ६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे.
का पुन्हा २१ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १४ मार्च ते १४ एप्रिल महिन्यात केवळ २८ रुग्ण आढळून आले होते. २० ते २५ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ७१ नवे रुग्ण आढळून आले. गुरुवारी सकाळी पहिल्या आलेल्या अहवालात बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात नगर शहरातील चार जणांचे, तर नगर तालुका, पारनेर, श्रीरामपूर, संगमनेर व राहाता येथील आहेत. गुरुवारी नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष, १८ वर्षे युवक पॉझिटिव्ह आढळला.
सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला बाधित आढळली. चंदनपूर (राहाता) येथील २४ वर्षीय युवक बाधित आढळला. संगमनेर शहरातील मोमिनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला, तर श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुष बाधित आढळला.
श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली. ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्ण मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून, मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.
कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष बाधित आहे, तो मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. त्यानंतर रात्री पुन्हा ९ व्यक्ती बाधित आढळून आल्या.
यातील ८ जण नगर शहरातील वाघगल्ली, नालेगाव येथील, तर एक जण संगमनेर तालुक्यातील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews