अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले.

तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांत एकाही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली नव्हती.

मात्र गेल्या महिन्यापासून सुमारे ७५ पोलिसांना कोरोना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यातील बहुतेक जणांनी कोरोनावर मात केली असून एका सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला आहे.

पोलीस दलात वाढता करोना धोका लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमारसिंह यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. कोरोना बाधित पोलिसांना वेळेत व चांगले उपचार मिळावे, यासाठी काही खाजगी रुग्णालयात काही बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तर, पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, शीघ्र कृती दलाचे जवान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड अशा सुमारे ७० ते ७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

यातील काही पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर, मुख्यालयातील सहाय्यक फौजदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस दलात वाढते संक्रमण लक्षात घेता पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांना सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप केले जात आहे. ज्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांत राखीव बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, पोलीस मुख्यालयात कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24