अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : नेवासे तालुक्यात कोरोचा प्रभाव वाढला आहे. तालुक्यातील महत्वाच्या कार्यालयातील मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी बाधित झाले आहेत.
यामुळे कार्यालयातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांना करोना विषाणूची लागण झाल्याने कर्मचारी संख्या 100 टक्के ऐवजी 33 टक्के करण्यात आली आहे.
यामुळे तालुक्यातील जनतेने अतिमहत्वाचे काम असले तरच पंचायत समिती कार्यालयात यावे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महत्वाचे काम असेल तर कार्यालयात यावे.
असे आवाहन पत्रकार परिषदेत सभापती रावसाहेब कांगुणे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. यावेळी उप सभापती किशोर जोजार, गटविकासाधिकारी शेखर शेलार हे उपस्थित होते.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समिती कार्यालय निर्जंतुकरण करण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved