अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शहरातही अनेक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाने आता शासकीय कार्यालये विळख्यात घेण्यास सुरवात केली आहे.
महापालिका, जिल्हा परिषद त्यापाठोपाठ माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना घुसला. आता त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये कोरोनाने शिरकावं केल्याने खळबळ उडाली आहे.
येथील जिल्हा पुरवठा विभागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांच्या कालावधीसाठी पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे.
दक्षतेचा उपाय म्हणून कार्यालयातील 30 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्त्राव तपासले आहे. दोन बाधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले.
दरम्यान नगरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४ इतकी झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com