अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला,यामुळे कोरोनामुळे मूर्त पावलेल्या जिल्ह्यातील बळींची संख्या ९८९ झाली आहे. पाच महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात सर्वात कमी १२३ रुग्ण आढळले.
यापूर्वी जिल्ह्यात २७ जुलैला १७३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. सर्वाधिक ३१ संगमनेरला, तर नगर शहरात २४ रुग्ण आढळले.
मागील २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६, खासगी प्रयोगशाळेत ४५ आणि अँटीजेन चाचणीत ५२ बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा १०, अकोले १, जामखेड २, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ४, श्रीगोंदे ५ आणि कॅन्टोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा १३, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, पारनेर ३, राहाता ९, राहुरी १, संगमनेर १४ रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा १, जामखेड ३, कर्जत ३, कोपरगाव ८, नगर ग्रामीण ३, नेवासे २, राहाता ८, संगमनेर १७, शेवगाव १, श्रीगोंदे २ आणि श्रीरामपूर ४ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ६६ हजार ५२७ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६४ हजार २७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मास्क लावण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.