अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे आजही समोर आले आहे आजही काेराेनाबाधितांचा आकडा 600 च्या जवळ पाेहाेचला आहे.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आज 599 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 186 रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर शहर 186, राहाता 72, संगमनेर 29, श्रीरामपूर 83, नेवासे 22, नगर तालुका 21, पाथर्डी 34, अकाेले 06, काेपरगाव 21, कर्जत 20, पारनेर 13, राहुरी 33, भिंगार शहर 04, शेवगाव 29, जामखेड 05, श्रीगाेंदे 04 आणि इतर जिल्ह्यातील 17 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 51, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 390 आणि रॅपिड चाचणीमध्ये 158 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात कोरोना संसर्गाचे आकडे हे तीन अंकी आहेत.