अहमदनगर लाईव्ह24 टीम :- प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार आपल्या देशात होऊ नये, यासाठी उत्तर कोरियाने आपल्याच नागरिकांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर कोरियात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्याला गोळ्या घालण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांना वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने रुग्णांना मारण्याचा पवित्रा घेतला आहे. उत्तर कोरियात कोरोनाच्या रुग्णाला गोळ्या घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही पाश्चिमात्य संकेतस्थळांवरील वृत्तानुसार गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाचा एक व्यापारी अधिकारी चीनहून परतला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतरदेखील त्याने सार्वजनिक शौचालयाचा उपयोग केला. त्यामुळे त्याला गोळ्या घालण्यात आल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com