अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. काल दोन महिला व एक पुरुष असे तीन व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले.
संगमनेर शहरातील नायकवाडपुऱ्यातील महिला व मोमिनपुरा येथील पुरुष व तालुक्यातील कुरण येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी प्रशासनाने दिली.
बाधितांचा आकडा आता १०० झाला आहे.त्यामध्ये 84 तालुक्यातील व 15 बाहेरील असून सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शहरातील नायकवाडपुरा येथील ५० वर्षीय महिला, मोमिनपुरा येथील ४६ वर्षीय पुरुष व तालुक्यातील कुरण येथील ८५ वर्षीय महिलेला कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
शहरातील दोघे बाधित कंटेन्मेंट झोनमधील आहेत. नायकवाडपुरा, मोमिनपुरा व कुरण येथील बाधित रहिवासातील क्षेत्र प्रशासनाने सील केले असून बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews