अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ७ रुग्णांची भर पडली. नगर शहर ४, राहाता १, तर संगमनेर येथे २ रुग्ण आढळले. यापैकी एक व्यक्ती मुंबईहून आलेली आहे.
नगर शहरातील कल्याण रस्ता भागात ५५ वर्षांची महिला, केडगाव येथील २९ वर्षीय व्यक्ती, १६ वर्षांची मुलगी १२ वर्षांचा मुलगा बाधित आढळला. राहाता येथील खंडाेबा चौकातील १३ वर्षांची मुलगी कोरोना बाधित झाली.
जिल्ह्यातील अॅक्टिव केसेस ४९ असून एकूण रुग्णसंख्या २५८ आहे. संगमनेर शहरातील इस्लामपुरा येथील युवक, तसेच मोगलपुरा येथील पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, मालदाड रोड येथील ७२ वर्षीय बाधित वृद्धेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी मृत्यू झाला. मुंबई येथील २४ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र तिचा संगमनेरात संपर्क नसल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी रविवारी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews