कोरोना रुग्णांना मिळणार बिलांमधील परतावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-कोरोना रुग्णांवर उपचारापोटी नियमापेक्षा जास्त बिलाची आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना महापालिका नोटीस बजावणार आहे. सात दिवसांत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मनपास्तरावर मागितला जाणार आहे.

महिनाभरापासून लांबलेली प्रक्रिया गुरूवारपासून सुरू होत आहे. शासनाने आरोग्य सेवेचे दर निश्चित केले आहेत. तथापि, कोरोना रुग्णांकडून ज्या रुग्णालयांनी शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी केली, अ

शी बिले जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या समितीसमोर निर्णयासाठी आहेत. आतापर्यंत सुमारे ९८ रुग्णांचे ११ लाख रूपये शासकीय दरापेक्षा जास्त आकारल्याच्या निष्कर्षापर्यंत समिती आली आहे.

ज्या रुग्णांकडून जास्तीची बिले आकारण्यात आली, ती वसूल करून पुन्हा रुग्णांना अदा करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना समितीने आदेश दिले आहेत.

समितीने महापालिकेला दिलेल्या आदेशात रुग्णालयांसह रुग्णांच्या नावांचीही यादी दिली आहे. समितीने आदेश देऊन एक महिना उलटला, तरी ढिम्म मनपा प्रशासन बिले वसुलीसाठी धजावत नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल बोरगे हे गुरुवारी (१५ आॅक्टोबर) संबंधित रुग्णालयांना वसुलीस पात्र रक्कम रुग्णांना सात दिवसांत अदा करण्याबाबत कळवणार आहे. रुग्णालयांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागितला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24