अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरातील चक्क एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे.
यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश दिला आहे. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी ही अनोखी शक्कल लावली असून, हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
एका औषध कंपनीने अकोले बायपास रोडवरील एका चौकात सूर्यनमस्कार घालताना एक पुतळा बसविला आहे. याच पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क’ घातला आहे.
या फोटोची संगमनेरात चांगलीच चर्चा होत आहे. संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकही सोशल डिस्टन्स पाळत आहेत. परंतु या अज्ञाताने या पुतळ्याला मास्क घालून कोरोना रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews